डेन्मार्कमध्येही जाळण्यात आले कुराण !

रैसमस पलुदान

कोपनहेगन (डेन्मार्क) – स्विडन आणि नेदरलँड्स यांनंतर आता डेन्मार्कमध्येही कुराण जाळण्यात आले. कोपनहेगन मशिदीजवळ आणि तुर्कीयेच्या दूतावासाजवळ या घटना घडल्या. डेन्मार्कमध्ये कुराण जाळल्यानंतर तुर्कीयेने डेन्मार्कच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून समज दिली.

१.  रैसमस पलुदान या व्यक्तीने कुराण जाळले. यापूर्वी त्यानेच स्विडनमध्ये तुर्कीये देशाच्या दूतावासाबाहेर कुराण जाळले होते. तेव्हा त्याने म्हटले होते की, जर स्विडनला ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) देशांमध्ये सहभागी करण्यास तुर्कीये होकार देत नाही, तोपर्यंत मी प्रत्येक शुक्रवारी कुराण जाळणार आहे.

२. युरोपमधील स्विडन आणि फिनलंड यांना ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी व्हायचे आहे; मात्र ३० सदस्य असलेल्या नाटो देशांमधील तुर्कीये यास विरोध करत आहेत. आता तुर्कीयेने स्पष्ट केले आहे की, कुराण जाळल्यामुळे नाटो देशाचे सदस्य होण्याची अपेक्षा ठेवू नये.