दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वायूदलाच्या ३ विमानांचा अपघात !

दोन वैमानिक घायाळ, तर दोन वैमानिक बेपत्ता !

घटनास्थळ

मुरैना (मध्यप्रदेश) – भारतीय वायूदलाच्या ३ विमानांचा २ वेगवेगळ्या घटनांमध्ये अपघात झाला. मुरैना येथे लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० यांच्यात टक्कर  होऊन ही दोन्ही विमान कोसळली. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील वायूदलाच्या तळावरून सरावासाठी उड्डाण केले होते. या विमानांतील ३ पैकी २ वैमानिक घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर तिसर्‍या वैमानिकाची माहिती मिळू शकलेली नाही.

दुसर्‍या घटनेत राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे सैन्याचे विमान कोसळले. ही सर्व विमाने कोळल्यावर त्यांना आग लागली. प्रशासनाला ही माहिती मिळाताच साहाय्य कार्य हाती घेण्यात आले. भरतपूर येथे कोसळलेल्या विमानाची आणि वैमानिकाची माहिती मिळू शकली नाही.