चीन आणि भारत अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे ! – रशिया

मध्यभागी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव

मॉस्को (रशिया) – पाश्‍चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले. या वेळी त्यांनी ‘चीन आणि भारत हे रशियाचे खरे मित्र आहे’, असेही सांगितले.