पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धी, हे अल्लाचेच दायित्व ! – पाकचे अर्थमंत्री इशक दार

पाकचे अर्थमंत्री इशक दार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अल्लाने पाकिस्तान जगात अनादि काळापर्यंत अस्तित्वात रहाण्यासाठी निर्माण केला आहे. जगभरात हा एकमेव देश आहे की, ज्याची निर्मिती इस्लामच्या नावे झाली आहे. सौदी अरेबियाचीही निर्मिती इस्लामच्या नावे झालेली नाही. त्यामुळे जर अल्लाने याची निर्मिती केली आहे, तर पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धी, हेही अल्लाचेच दायित्व आहे, असे विधान पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री इशक दार यांनी केले.

इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे. वर्ष २०१३ ते २०१७ या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत होती. पाकिस्तानचा ‘शेअर बाजार’ दक्षिण आशियात सर्वोत्कृष्ट होता. नवाज शरीफ यांच्या कळात तो जगात ५ व्या क्रमांकावर होता; पण नंतरच्या काळात हा विकासाचा गाडा भरकटला.