नांदेड येथील कु. लक्ष्मी येडलेवार हिला ‘राष्‍ट्रीय बाल शौर्य’ पुरस्‍कार घोषित !

येत्‍या २६ जानेवारी या दिवशी देहली येथे या पुरस्‍काराने तिचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्‍कारामुळे तिच्‍या थडी सावळी गावातील ग्रामस्‍थांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.

संभाजीनगर येथे प्‍लास्‍टिकच्‍या आस्‍थापनाला भीषण आग !

‘साहिल प्‍लास्‍टिक चटया’ बनवणारे हे आस्‍थापन आहे. अग्‍नीशमनदलाच्‍या वाहनांनी आग विझवली आहे.

हिंदूंच्‍या प्रत्‍येक समस्‍येवर एकच उपाय – ‘शिवाजी’ नावाचा मंत्र ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

मकरसंक्रांतीच्‍या दिनी नागोठणे (जिल्‍हा रायगड) येथे शिवतेजाला झळाळी ! ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ किती जण वाचतात ?’ असा प्रश्‍न पू. भिडेगुरुजी यांनी या सभेमध्‍ये व्‍यासपिठावरून विचारला.

देशभक्‍ती, धर्मभक्‍ती, मातृभूमी यांविषयी अपार निष्‍ठा निर्माण होण्‍यासाठी प्रत्‍येकाने गडकोट मोहिमेसाठी आलेच पाहिजे !

धारातीर्थ यात्रेनिमित्त कोल्‍हापूर येथे पू. संभाजीराव भिडेगुरूजींचे मार्गदर्शन ! प्रत्‍येकाने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचलेच पाहिजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्‍या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍याची हत्‍या करण्‍यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.

स्‍वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर ‘श्रद्धा’ ठेवणे सोडा !

‘मागील काही दिवसांपासून सर्वत्र केवळ ‘श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला प्रकरण’ म्‍हणजेच ‘श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरण’, ही एकच चर्चा चालू आहे. जे घडले, ते अतिशय भयंकर असून यातूनही जर आज आपण धडा घेतला नाही,

वैदिक संस्‍कृतीचा द्वेष आणि तिला नामशेष करण्‍याचे षड्‍यंत्र !

वैदिक संस्‍कृतीची स्‍मृती होईल, अशा वस्‍तू आमच्‍याच राष्‍ट्रातून नामशेष झालेल्‍या दिसत आहेत. आम्‍ही वैदिक संस्‍कृतीच्‍या हवेत श्‍वास घ्‍यावा, ही उत्‍कटता असतांना कडव्‍या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्‍य झाले आहे.

आधुनिक वैद्यांची ग्रामीण भागातील रुग्‍णसेवा ?

आधुनिक वैद्यांना ग्रामीण भागात जाण्‍याचे महत्त्व सांगणे आणि ते का जात नाहीत ? याचा अभ्‍यास करून ती कारणे दूर करणे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. काही कालावधीसाठीही ग्रामीण भागात जाण्‍यास नाकारणारे आधुनिक वैद्य, हे मिळवलेल्‍या पदवीला खर्‍या अर्थाने न्‍याय देत आहेत का ? हे महत्त्वाचे !

हे कसले लांच्‍छनास्‍पद शिक्षणमंत्री !

संत गोस्‍वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्‍तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्‍थानातील अनेक लोकांचा नित्‍य वाचनातील ग्रंथ आहे.