संभाजीनगर येथे प्‍लास्‍टिकच्‍या आस्‍थापनाला भीषण आग !

संभाजीनगर येथे प्‍लास्‍टिकच्‍या आस्‍थापनाला भीषण आग

संभाजीनगर – ‘वाळूज’ औद्योगिक वसाहतमधील जोगेश्‍वर परिसरातील एका प्‍लास्‍टिक आस्‍थापनाला १६ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली असून परिसरातील ३-४ घरांनीही पेट घेतल्‍याचे समजते. दूरवरून आगीचे उटलेले लोळ दिसत आहेत.

ही आग कशामुळे लागली ? हे समजू शकले नाही. या घटनेत किती हानी झाली ? हे समोर आले नाही. ‘साहिल प्‍लास्‍टिक चटया’ बनवणारे हे आस्‍थापन आहे. अग्‍नीशमनदलाच्‍या वाहनांनी आग विझवली आहे.