देशभक्‍ती, धर्मभक्‍ती, मातृभूमी यांविषयी अपार निष्‍ठा निर्माण होण्‍यासाठी प्रत्‍येकाने गडकोट मोहिमेसाठी आलेच पाहिजे !

धारातीर्थ यात्रेनिमित्त कोल्‍हापूर येथे पू. संभाजीराव भिडेगुरूजींचे मार्गदर्शन !

धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी

कोल्‍हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – राज्‍यात असलेले गडकोट हे शिवछत्रपतींचेच रूप आहेत. वयाच्‍या १५ व्‍या वर्षापासून मृत्‍यू येईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या भारणीसाठी अखंड कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मनात असलेली देशभक्‍ती, धर्मभक्‍ती, मातृभूमी यांविषयीची अपार निष्‍ठा आपल्‍या मनात निर्माण होण्‍यासाठी प्रत्‍येकाने गडकोट मोहिमेसाठी आलेच पाहिजे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते पाचगाव येथील ‘श्री गजानन मल्‍टीपर्जज हॉल’ येथे धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत श्रीभीमाशंकर ते श्रीशिवनेरी (मार्गे श्रीवरसुबाई) अशी होत आहे. त्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या मार्गदर्शनात ते बोलत होते. या वेळी श्री. आशिष लोखंडे, श्री. सुरेश यादव यांसह धारकरी, महिला मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होत्‍या.

पू. भिडेगुरुजी यांचे औक्षण करून स्‍वागत करतांना महिला

१. आपली मोहीम म्‍हणजे ‘हायकिंग’, ‘ट्रेकिंग’ नाही, तर मोहीम म्‍हणजे प्रत्‍यक्ष गड-दुर्गांना अनुभवणे, जगणे होय !  शिवछत्रपतींच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या भूमीत आपण गेल्‍यावर आपल्‍यातही धर्मनिष्‍ठा उत्‍पन्‍न होते. संपूर्ण देशाचे चित्र पालटण्‍याची शक्‍ती मोहिमेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला हार घालतांना पू. भिडेगुरुजी
छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या मूर्तीला हार घालतांना पू. भिडेगुरुजी
धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी
मार्गदर्शनासाठी उपस्‍थित धारकरी

२. आताचे अनेक शिवचरित्रकार पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यावर व्‍याख्‍याने देतात, ते योग्‍य नाही.

३. आपली परंपरा, आपली संस्‍कृती, आपला धर्म यांविषयी आत्‍यंतिक पोटतिडीक म्‍हणजेच ‘हिंदुत्‍व’ होय. हिंदु धर्म हा जगाच्‍या पाठीवर असलेला सर्वोत्‍कृष्‍ट धर्म आहे.

क्षणचित्रे

१. सभास्‍थळी राष्‍ट्र आणि धर्म यांवरील विविध पुस्‍तके विक्रीसाठी ठेवण्‍यात आली होती. यात ‘पणतीला जपतांना’सह विविध पुस्‍तकांचा समावेश होता.

२. १२ फेब्रुवारीला कोल्‍हापूर येथील ‘पद्माराजे गर्ल्‍स हायस्‍कूल’च्‍या मैदानावर हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित केली आहे. या सभेचे निमंत्रण उपस्‍थित धारकर्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी दिले.

धारकर्‍यांना हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देतांना श्री. अमोल कुलकर्णी

३. कोल्‍हापूर येथे १ जानेवारीला झालेल्‍या ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्‍या’त सामाजिक माध्‍यमांचे दायित्‍व उत्‍स्‍फूर्तपणे पार पाडल्‍याविषयी धारकरी श्री. अभिषेक खडके यांचा पू. भिडेगुरुजी यांच्‍या हस्‍ते भगवा फेटा बांधून, शाळ, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.

धारकरी श्री. अभिषेक खडके याचा सत्‍कार करतांना पू. भिडेगुरुजी

प्रत्‍येकाने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचलेच पाहिजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या संदर्भात बोलतांना पू. भिडेगुरुजी म्‍हणाले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’सारखे दैनिक आजपर्यंत झाले नाही. देशात १० लाख हिंदू धर्मांतरित झाले आहेत. धर्मांतराच्‍या संदर्भातील ही आकडेवारी मला दैनिकातूनच समजली. तरी प्रत्‍येकाने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचलेच पाहिजे.’’