सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत सोलापूर येथे चैतन्यमय वातावरणात पार पडला श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा !

अपूर्व उत्साह आणि शिस्त यांचे दर्शन घडवणार्‍या या सोहळ्यास दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. लाखो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला.

पाकमधील हिंदूंच्या निर्घृण हत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा !

हिंदूंसाठीच भारताने ‘सीएए’ कायदा बनवला आहे; पण त्यालाही विरोध करण्यात आला. त्यांना भारताविना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय मिळाला पाहिजे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी !

नागपूर पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रक्रियाकृत सांडपाणी उद्यानांना देऊन प्रतिदिन २० लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत !

महापालिकेचे मागील ४ मासांत ११ लाख ५० सहस्र रुपये वाचवण्याचे काम सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

तुर्भे (वाशी) येथील परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज !

आचारसंहितेचे उल्लंघन करत अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याच्या प्रकरणातील दुर्लक्ष करणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

महाबळेश्वर येथील एका अतीदुर्गम गावात ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !

पीडित मुलगी घरात एकटीच दूरचित्रवाणी संच पहात बसली होती. याचा अपलाभ घेत रमेश याने मुलीवर अत्याचार केले आणि खेड येथे पळ काढला.

(म्हणे) ‘मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे !’-अभिनेत्री उर्फी जावेद

अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगतांना समाजभानही जोपासणे आवश्यक आहे, हे उर्फी जावेद कधी लक्षात घेणार ?

सिंधुदुर्ग : महसूल विभागाची वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात धडक कारवाई

जिल्ह्यातील वाळू व्यवसायावर प्रशासनाने करडी नजर ठेवून अवैध कृत्ये करणार्‍यांना धाक वाटेल, अशी कार्यवाही करणे अपेक्षित !

गोवा : हणजूण येथे ध्वनीप्रदूषणाविषयी एका उपाहारगृहावर कारवाई

या उपाहारगृहाच्या मालकांनी ध्वनीप्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ यांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी उपाहारगृहातील ध्वनीक्षेपक जप्त केले आहेत. यासंबंधी पुढील अन्वेषण चालू आहे.

गोवा : पर्यटनाशी संबंधित मोठ्या कार्यक्रमांसाठीच्या शुल्कात १० टक्क्यांनी वाढ

या कार्यक्रमांच्या अनुज्ञप्तीसाठी खात्याकडे जमा करण्यात येणार्‍या सुरक्षा रकमेत कोणताही पालट करण्यात आलेला नाही.