पोलिसांच्या नोटिसीनुसार पोलीस ठाण्यात उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री उर्फी जावेद हिचा जबाब !
मुंबई – मी भारताची नागरिक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे परिधान करते, ते माझ्या आवडीने परिधान करते. असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही.
सार्वजनिक जगहों पर अंग प्रदर्शन कर फंसीं अभिनेत्री उर्फी जावेद, मुंबई पुलिस ने भेजा नोटिस.#inkhabar #urfijaved @uorfi_ pic.twitter.com/Jkfvv03Tln
— InKhabar (@Inkhabar) January 14, 2023
मी घालत असलेले कपडे हे माझ्या कामाच्या अनुषंगाने असतात. त्यावरून माझी छायाचित्रे काढली जातात. कधी कधी कपडे पालटण्यास वेळ नसतो. त्याच वेळी छायाचित्रक घेऊन आलेले लोक माझी छायाचित्रे काढतात. ही छायाचित्रे सर्वत्र प्रसारित केली जातात. ही छायाचित्रे प्रसारित होणे मी कसे थांबवू ? अशी विधाने अभिनेत्री उर्फी जावेद हिने केली आहेत.
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिला नोटीस पाठवली होती. त्यानुसार ती आंबोली पोलीस ठाण्यात उपस्थित राहिली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार प्रविष्ट केली होती. तेथे जबाब नोंदवतांना ती बोलत होती.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगतांना समाजभानही जोपासणे आवश्यक आहे, हे उर्फी जावेद कधी लक्षात घेणार ? |