केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी !

आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या नावे दिली धमकी : खंडणीची मागणी

नागपूर – भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येथील त्यांच्या कार्यालयात धमकीचा दूरभाष आला होता.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या नावे ही धमकी देण्यात आली असून खंडणीही मागण्यात आली आहे. यामुळे नागपूर पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गडकरी यांचे निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालय येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.