सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा) येथील धर्मांतर तात्काळ बंद करण्याविषयी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

तालुक्यातील साखरखेर्डा येथील गोरेगाव फाटा येथे ख्रिस्त्यांकडून चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा महाराज शिंगणे यांनी निवेदनाद्वारे साखरखेर्डा पोलीस ठाणेदार यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे.

वारकर्‍यांना सोयी-सुविधा पुरवण्यातील त्रुटी सुधारण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे आषाढी आणि कार्तिकी या २ यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात. शासन आणि प्रशासन यांच्याकडून मात्र पुष्कळ अल्प सुविधा वारकर्‍यांना उपलब्ध करून दिल्या जातात.

ठाणे जिल्ह्यातील मराठीत नामफलक नसलेल्या १५३ दुकानांवर फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील दुकाने आणि व्यापारी आस्थापनांवरील फलक मराठी  देवनागरी लिपित प्रदर्शित न करणारी १५३ दुकाने आणि व्यापारी आस्थापने यांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा कामगार उपायुक्त कार्यालयाने उगारला आहे, तर १५ दुकानांच्या मालकांवर सुमारे साडेतीन लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

शिरपूर (जिल्हा धुळे) येथे ७२१ किलो गांजाचे पीक जप्त !

तूर, मका, कापूस या पिकांच्या आडून संशयित गुप्तपणे गांजाची शेती करत होते. या संदर्भात दोघा संशयितांविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील नेते आणि राष्ट्रपुरुष यांच्या पुतळ्यांचे विद्रूपीकरण !

राष्ट्रपुरुषांचा अवमान होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी !

ह.भ.प. ज्योतिराम चांगभले महाराज यांची ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या प्रदेश अध्यक्षपदी निवड !

वर्ष २००७ मध्ये ह.भ.प. ज्योतिराम चांगभले यांना सोलापूर शहर अध्यक्ष पदाचे दायित्व देण्यात आले होते, तसेच वर्ष २०१९ मध्ये त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.

पुन्हा एकदा आरंभ !

‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्‍या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !

डोंबिवली येथे बेशिस्तपणे रिक्शा उभ्या करणार्‍या चालकांवर कारवाई

रेल्वेस्थानकातून बाहेर पडतांना बर्‍याचदा प्रवाशांचे रिक्शाचालकांशी खटके उडल्याच्या घटना घडतात. बर्‍याचदा रिक्शाचालकांकडून अरेरावीची भाषा केली जाते. या सर्वच प्रकाराला कंटाळून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

बहुसंख्य हिंदूंच्या भारतातील असुरक्षित हिंदू !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कपाळावर टिळा आणि मनगटावर दोरा बांधलेल्या हिंदूला पाहून धर्मांध मुसलमानांच्या जमावाने एका किरकोळ अपघातावरून त्याला मारहाण केली.

वाढते तापमान, विकासाचा मानवी हव्यास आणि जीवसृष्टी वाचवण्याची आवश्यकता !

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास आणि हानी रोखण्यासाठी धर्माधारित शाश्वत विकास हवा !