ह.भ.प. ज्योतिराम चांगभले महाराज यांची ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या प्रदेश अध्यक्षपदी निवड !

ह.भ.प. ज्योतिराम चांगभले महाराज

सोलापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या प्रदेश अध्यक्षपदी ह.भ.प. ज्योतिराम चांगभले महाराज यांची निवड करण्यात आली आहे. वर्ष २००७ मध्ये ह.भ.प. ज्योतिराम चांगभले यांना सोलापूर शहर अध्यक्ष पदाचे दायित्व देण्यात आले होते, तसेच वर्ष २०१९ मध्ये त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र राज्य भजन स्पर्धेत २ वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते सोलापूर शहर आणि जिल्हा येथील अनेक मुलांना मृदंग वादनाचे शिक्षण देण्याचे अनमोल कार्य करत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाचे दायित्व देण्यात आले आहे, असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी या वेळी सांगितले.