ठाणे – जिल्ह्यातील दुकाने आणि व्यापारी आस्थापनांवरील फलक मराठी देवनागरी लिपित प्रदर्शित न करणारी १५३ दुकाने आणि व्यापारी आस्थापने यांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा कामगार उपायुक्त कार्यालयाने उगारला आहे, तर १५ दुकानांच्या मालकांवर सुमारे साडेतीन लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. शासनाने घोषित केल्याप्रमाणे मराठीतून नामफलक लावले कि नाही, हे पहाण्यासाठी अलीकडेच जिल्ह्यामध्ये अन्वेषण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे ४५७ दुकाने आणि व्यापारी आस्थापने यांना भेटी देण्यात आल्या. त्यांतील ३०४ दुकाने आणि आस्थापने यांची नावे मराठीमध्ये असल्याचे आढळून आले. मराठी, म्हणजेच देवनागरी लिपित फलक प्रदर्शित न करणारी ही दुकाने आणि व्यापारी आस्थापने यांच्या मालकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.