शिरपूर (जिल्हा धुळे) येथे ७२१ किलो गांजाचे पीक जप्त !

धुळे – शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी परिसरात असलेल्या लाकड्या हनुमान शिवारात शेतीत लपूनछपून गांज्याची लागवड करण्यात आली होती. पिकांमध्ये लागवड केलेल्या गांजाच्या शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून ७२१ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याची बाजारामध्ये किंमत जवळपास १४ लाख ४२ सहस्र रुपयांपेक्षा अधिक आहे.

तूर, मका, कापूस या पिकांच्या आडून संशयित गुप्तपणे गांजाची शेती करत होते. या संदर्भात दोघा संशयितांविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

नशेसाठी वापरल्या जाणार्‍या पिकावर बंदी असतांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाणे, हे कायद्याचा धाक नसल्याचेच द्योतक ! अशांना कठोर शिक्षाच हवी !