इयत्ता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ !

अंतिम वार्षिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ नोव्हेंबर, तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

घोडेगाव (पुणे) येथे उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा !

आंबेगाव, पुणे येथील युवा उद्योजक, ‘जे.के. ग्रुप’चे संस्थापक, तसेच व्यापार आघाडीचे अध्यक्ष श्री. जयेशभाऊ काळे पाटील यांच्या २७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकाचा सन्मान सोहळा नुकताच घोडेगाव येथील ‘अमित गेस्ट हाऊस’मधील मंगल कार्यालयात साजरा झाला.

वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळा जवान संघटना आणि तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली.

पुणे येथे इतिहासप्रेमी मंडळाने कांचनबारीच्या (जिल्हा नाशिक) लढाईचा इतिहास जिवंत केला

वर्ष १६७० मध्ये सूरत लुटून परत येत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी युद्ध करावे लागले. शत्रूच्या प्रदेशात असूनही युद्धनीतीचा चातुर्याने वापर करत मराठ्यांनी विजय मिळवला. ही विलक्षण शौर्यकथा इतिहासप्रेमी मंडळाने ४० X २५ फूट भव्य प्रतिकृतीतून ‘साउंड अँड लाईट शो’द्वारे उलगडली आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला अवैध इमारतींची माहिती द्या !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत किती अनधिकृत आणि अवैध इमारती आहेत. यांपैकी किती बांधकामधारकांनी महानगरपालिकेची अनुमती न घेता, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन अवैध इमारती उभारल्या आहेत

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहूच !

‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्‍या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !

पनवेल येथे मुसलमान मित्राकडून बारबालेला क्षुल्लक कारणावरून मारहाण !

२ वर्षांपासून ती रिक्शाचालक मित्र मुदतशीर बशीर राऊत याच्या समवेत करंजाडे येथे रहात आहे. बारबाला मुदतशीरला न सांगता बाहेर गेली होती. रात्री ती घरी परतल्यावर संतप्त झालेल्या मुदतशीरने तिला मारहाण करून शिवीगाळ केली.

दुर्गाडी (कल्याण) खाडीकिनारी वाळूमाफियांची सामग्री महसूल अधिकार्‍यांनी नष्ट केली !

अशा धडक कारवाईसह अधिकार्‍यांनी वाळूमाफियांना कठोर शासन होण्यासाठीही प्रयत्न करावेत !

पुणे येथील चांदणी चौकातील काम वेगाने पूर्ण करा ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाविषयी संबंधित अधिकार्‍यांसह त्यांनी सविस्तर चर्चा केली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

जळगाव येथील श्रीराम रथोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला !

वर्ष १८७१ मध्ये संत आप्पा महाराज यांनी जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढील वर्षी म्हणजेच वर्ष १८७२ च्या कार्तिक शुक्ल एकादशीपासून जळगावनगरीत श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ केला. यंदा या रथोत्सव परंपरेला १४९ वर्षे पूर्ण होत आहेत.