कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला अवैध इमारतींची माहिती द्या !

विशेष अन्वेषण पथकाचे आदेश !

ठाणे, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत किती अनधिकृत आणि अवैध इमारती आहेत. यांपैकी किती बांधकामधारकांनी महानगरपालिकेची अनुमती न घेता, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन अवैध इमारती उभारल्या आहेत, याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष अन्वेषण पथकाने (एस्.आय.टी) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. विशेष अन्वेषण पथकाने डोंबिवली येथील ६५ अवैध इमारतींच्या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले.

संपादकीय भूमिका

अवैध इमारती उभ्याच राहू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !