हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ असल्याने धर्मांतरास बळी पडू नका ! – पू. ईश्वरबुवा रामदासी

हिंदु धर्मात जन्माला येणे, ही पुष्कळ पुण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माचे परकियांपासून रक्षण करण्यासाठी स्वतःचे जीवन सार्थकी लावले.

कल्याण येथील गायरान भूमीवरील ४ सहस्र बांधकामांना नोटिसा !

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेल्या आदेशावरून कल्याण येथील तहसीलदारांनी त्यांच्या हद्दीतील गायरान भूमीवरील ४ सहस्र नागरिकांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.

दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश !

सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे हे १०० ग्रॅमची अचूकता दर्शवतात. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक हानी होते. यावर दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाने नुकतेच दिले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याच्या समन्वयासाठी राज्यशासनाकडून २ मंत्री नियुक्त !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याच्या न्यायालयीन समन्वयासाठी महाराष्ट्र सरकारकडून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे ! – शिवभक्तांची पुरातत्व विभागाकडे मागणी

लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा भोंगळ कारभार असणार्‍या पुरातत्व विभागाकडून गड-दुर्गांचे जतन केले जाईल याची अपेक्षा काय ठेवणार ? कामचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

हिजाबविरोधी खेळाडू !

इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

कर्नाटकातील वाढता जिहाद !

मंगळुरू बाँबस्फोटाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी राज्यात असलेल्या धर्मांधांवर कसा वचक बसवणार ?’, यासाठीही कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांना आजच रोखले, त्यांच्या मनात जरब निर्माण केली, तरच आतंकवादी कारवायांना खीळ बसेल !

आज प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने ते आपली संस्कृती आणि धर्म यांपासून दूर जात आहेत. विदेशी लोक आज हिंदु संस्कृतीनुसार आचरण करत आहेत; परंतु भारतातील बहुसंख्य हिंदू धर्मपालन करण्याकडे पाठ फिरवत आहेत.

रेठरे आणि शेरे या गावांना पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची ग्रामस्थांची मागणी !

रेठरे बुद्रुक आणि शेरे ही गावे लोकसंख्येने मोठी असून गावांना ६ मासांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नाही. त्यामुळे आहे त्या अधिकार्‍यांना गावांचा पदभार सांभाळावा लागत आहे.

दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर

दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. या घटनेची दखल घेत हे स्थानांतर करण्यात आले.