कल्याण येथील गायरान भूमीवरील ४ सहस्र बांधकामांना नोटिसा !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महसूल विभागाची कारवाई !

ठाणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने मागील मासात एका खटल्यात गायरान भूमीवरील सर्व अवैध अतिक्रमणे तोडण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेल्या आदेशावरून कल्याण येथील तहसीलदारांनी त्यांच्या हद्दीतील गायरान भूमीवरील ४ सहस्र नागरिकांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.