अयोध्येत ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारावे !

अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

श्रद्धा वालकर यांची निर्दयी हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का ? याचे अन्वेषण व्हावे ! – राम कदम, आमदार, भाजप

वसईतील रहिवासी श्रद्धा वालकर यांच्या निर्दयी हत्येच्या प्रकरणात आरोपी आफताब तिचे धर्मांतर करू इच्छित होता का ? श्रद्धाने त्याला नकार दिला का ? आणि हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का ?

मराठवाडा येथे गेल्या ४ वर्षांत ४५० कोटी रुपयांचा टँकर घोटाळा !

गटविकास अधिकारी कार्यालयातील टँकरचे प्रत्येक देयक पडताळले जाईल. प्रत्येक टँकर किती किलोमीटर चालेल ? कोणत्या गावात किती वाजता पोचेल ? कशाच्या आधारावर देयक निघाले ? याची पडताळणी होईल – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील

१ लाख युवकांना रोजगार देण्यासाठी राज्यशासनाचे विविध आस्थापनांसमवेत सामंजस्य करार !

१६ नोव्हेंबर या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास अन् रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधीच्या प्रतिकात्मक ‘पोस्टर’ला ‘जोडे मारा’ आंदोलन !

ठाणे येथे शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समर्थ भारत : जी-२० शिखर परिषद !

‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद मिळणे, हे भारताची आक्रमक आणि कणखर भूमिका सर्वमान्य असल्याचे द्योतक ! भारताच्या वाढत्या प्रभावामुळे केवळ विकसनशील देशच नाही, तर रशिया, अमेरिका, ब्रिटन यांनाही भारताचे मत काय? हे विचारात घ्यावे लागते किंवा भारताचे काही प्रमाणात ऐकावेही लागते !

चरस विक्रीप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील २ पोलिसांना अटक !

कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना चरसविक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे.

‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे काम अभियंत्यांच्या स्थानांतरामुळे रखडले !

पुणे शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी आणि मैलापाण्याची समस्या सोडवण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका प्रकल्प) काम ६ वर्षांनी चालू झाले आहे; परंतु सिद्ध केलेल्या कक्षातील अभियंत्यांचे स्थानांतर झाल्यावर तेथे नवे अधिकारी नियुक्त केले नाहीत.

तृणमूल काँग्रेसवर बंदी घाला !

बंगालच्या चपाली गावात तृणमूल काँग्रेसचा नेता अबुल हुसेन गायेन याच्या घरात चेंडू समजून बाँबशी खेळणार्‍या एका लहान मुलीचा या बाँबचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला.