अयोध्येत ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारावे !

विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

या पत्रात अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे की, प्रभु श्रीराम मंदिराचे अतीभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. अयोध्यानगरीत श्रीरामाच्या जन्मस्थळी दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. त्यांच्या निवासासाठी महाराष्ट्र सरकारने या मंदिराजवळ भक्तनिवास बांधल्यास अत्यंत सोयीचे होईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उत्तरप्रदेश सरकारकडे भूखंडाची मागणी करावी आणि तेथे हे भक्तनिवास बांधावे. कृपया यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी अपेक्षा आहे.’’