नागपूर येथे मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीतील सूत्रधारासह तिघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

नागपूर – शहरात लहान मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीचे सूत्रधार योगेंद्र आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती, तसेच या टोळीची महिला सूत्रधार श्वेता सावले उपाख्य श्वेता खान मकबूल खान (वय ४३ वर्षे) यांना न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टोळीने कोणकोणत्या ठिकाणांहून मुले चोरली, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सीमा परवीन अब्दुल रऊफ अन्सारी, बादल मडके, सचिन पाटील या तिघांसह ७ जणांना अटक केली आहे.

‘श्वेता हिने आतापर्यंत किती मुलांची विक्री केली ? हे ठाऊक नाही. आपण केवळ फरजाना उपाख्य असार कुरेशी (वय ४० वर्षे) हिला ओळखतो. तिच्याच सांगण्यावरून मुलांची चोरी केली आहे’, असे प्रजापती दांपत्याने पोलिसांना सांगितले; मात्र ते खोटे बोलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. श्वेता हिने इंदुरा येथील दांपत्याला मुले देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले. प्रजापती दांपत्याला ६० सहस्र रुपये, फरजाना हिला १० सहस्र रुपये, सचिन याला ५५ सहस्र रुपये, सीमा हिला १५ सहस्र रुपये, तर श्वेता हिने १ लाख रुपये घेतले आहेत, असे पोलीस अन्वेषणात उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका

अशा घटना घडूच नयेत, यासाठी अपहरणकर्त्यांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी !