सातार्‍यात नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

शंभूराज देसाई

सातारा, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्हा कारागृहात बंदीवानांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सातारा शहराजवळ नवीन कारागृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या साहाय्याने सादर करावा, असे निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा कारागृहाची पहाणी केली. तेव्हा ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कारागृह अधिकारी रमाकांत शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

तट भिंतीची उंची वाढवणे, कारागृहातील सर्व ‘बॅरेक’, स्वयंपाकगृह आणि कार्यालय यांवरील पत्रे पालटणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, अंतर्गत नाले दुरुस्ती करणे, स्वयंपाकगृहाचे नूतनीकरण करणे यांसह इतर कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.