सिंधुदुर्ग : मळगाव घाटात कचरा टाकणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवणार

सर्वसाधारण कर्तव्याची आणि दायित्वाची जाणीवही नसणारी जनता असणे, हे महासत्ता होऊ पहाणार्‍या भारत देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल !

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धत सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा !

आताचे निर्माते चित्रपटांतून हिंदूंच्या देवता, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक पुरुष आदींचे विडंबन करतात. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. लता मंगेशकर यांनी केलेले आवाहनाची ही अवहेलनाच आहे !

आधुनिक शिक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान यांतील भेद !

‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्‍वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबई विमानतळावर तस्करीचे ३२ कोटी रुपयांचे सोने पकडले !

मुंबई विमानतळावर २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तस्करी करण्यात येत असलेले ३२ कोटी रुपयांचे ६१ किलो सोने सीमा शुल्क विभागाने पकडले. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे, हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे.

केरळमध्ये स्वास्थ्य केंद्रातील ‘चेंजिंग रूम’मध्ये महिलांचे व्हिडिओ बनवणार्‍याला अटक !

जिल्ह्यातील कुडूर येथे असलेल्या एका स्वास्थ्य केंद्रातील कपडे पालटण्याच्या खोलीत (‘चेंजिंग रूम’मध्ये) एका युवतीचा व्हिडिओ मुद्रित केल्याच्या प्रकरणी रणजित नावाच्या एका रेडिओलॉजिस्टला अटक करण्यात आली आहे.

पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाविषयी सर्वाेच्च न्यायालयात उद्या सुनावणी !

पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात एप्रिल २०२० मध्ये जमावाने आक्रमण करून २ साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांची हत्या केली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १५ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

चीनने गलवान खोर्‍यातून सैन्यकपात केलेली नाही ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या मुळावर उठलेल्या धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल, अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात गोळीबार करणार्‍या शोएबला अटक !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात दोन दुचाकीस्वार युवकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी गोळीबार केला. दोघांपैकी एकाला तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी अटक केली असून दुसरा युवक फरार आहे. पकडण्यात आलेल्याचे नाव शोएब उपाख्य चोबा आहे. शोएबकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.