अलीगड मुस्लिम विद्यापिठात गोळीबार करणार्‍या शोएबला अटक !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील अलीगड मुस्लिम विद्यापिठात दोन दुचाकीस्वार युवकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी गोळीबार केला. दोघांपैकी एकाला तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी अटक केली असून दुसरा युवक फरार आहे. पकडण्यात आलेल्याचे नाव शोएब उपाख्य चोबा आहे. शोएबकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यापिठात शोएब आणि काही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. शोएबने त्याचा राग धरला आणि थोड्या वेळाने अन्य एका साथीदाराला आणून तेथे अंदाधुंद गोळीबार करण्यास आरंभ केला. स्थानिक सुरक्षा कर्मचार्‍यांनी सतर्क होऊन शोएबला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.