ठाणे येथे बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना अटक !

बनावट नोटा चलनात आणणारे राम शर्मा आणि राजेंद्र राऊत यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी !

सीमा शुल्क न भरल्यामुळे शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर रोखले !

सीमा शुल्क न भरल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांना मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी रोखले. १ घंटा पडताळणी करून, तसेच सीमा शुल्काचे ६ लाख ८३ सहस्र रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

धर्मांध मुसलमानाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा; मात्र छत्रपती शिवरायांच्या जयघोषावर मौन !

हिंदूंनो, तुम्ही अफझलखानाची कबर आणि दर्गे यांपुढे डोके टेकवत असलात, तरी धर्मांध मुसलमान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून तरी नतमस्तक होतात का ? याचा वेळीच विचार करा !

गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

नवी मुंबई येथे ३ लाखांची लाच मागणारी महिला तहसीलदार पोलिसांच्या कह्यात !

महिलाही भ्रष्टाचारात पुढे असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

पिंपरी (पुणे) शहरामध्ये गत ५ वर्षांत गोहत्येच्या ६४ गुन्ह्यांची नोंद !

पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गेल्या ५ वर्षांमध्ये गायींची चोरी, हत्या आणि गोवंश मांस विक्री या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या संदर्भातील ६४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय पथकाला मान्यता न मिळाल्यास कोकणात ‘एस्.डी.आर्.एफ्.’चे पथक उभारण्याची राज्यशासनाची सिद्धता !

रायगड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला अनुमती न मिळाल्यास राज्य आपत्ती निवारण पथक उभारण्यास महाराष्ट्र शासन सिद्ध आहे. यासाठीचा आराखडा राज्यशासनाकडून सिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती निवारण पथकाकडून देण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपटनिर्मिती करणार !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य…

पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांमुळे नवी मुंबई स्वच्छतेत पुढे ! – संदीप नाईक, माजी आमदार

पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांमुळे नवी मुंबई स्वच्छतेत पुढे आहे, असे प्रतिपादन ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांनी येथे केले. ते ‘मँग्रोव्हज मार्शल ग्रुप’च्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांचा सत्कार करतांना बोलत होते.

नगर येथील पशूवधगृहातून १ सहस्र १०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांना अटक !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही तो धाब्यावर बसवून दिवसरात्र होणार्‍या गोहत्या कधी थांबणार ? कारवाया करूनही या उद्दाम प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व हवे. तरच गोरक्षा शक्य आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?