पाद्रींचे आडनाव ‘भिडे’ किंवा ‘कुलकर्णी’ नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.

भारत जोडो यात्रेत ‘कॉपीराईट’ असलेले संगीत वापरल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार !

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या अंतर्गत पक्षाने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘के.जी.एफ्. चॅप्टर २’ या चित्रपटातील ‘कॉपीराईट’ असलेले संगीत विनाअनुमती वापरले.

चीनने पूल आणि गावे यांना दिली गलवान खोर्‍यात ठार झालेल्या सैनिकांची नावे !  

चीनने त्याच्या शिनजियांग आणि तिबेट यांना जोडणार्‍या महामार्गावरील पुल अन् तेथील गावे यांना दोन वर्षांपूर्वी लडाखच्या गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षात ठार झालेल्या ४ सैनिकांची नावे दिली आहेत.

शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा ! – सूरी यांच्या मुलाची मागणी

४ नोव्हेंबर या दिवशी एका खलिस्तान्याकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या मुलाने सूरी यांना ‘वीरगतीला प्राप्त’ (हुतात्मा) असा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली.

चीनने त्याची गुप्तहेर नौका पाठवली हिंद महासागरात !

चीनने तिची गुप्तहेर नौका ‘युआन वांग-६’ हिंद महासागरात तैनात केली आहे. चीनने ऑगस्ट २०२२ मध्ये हीच नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पाठवली होती. तेथे ती ६ दिवस थांबली होती.

भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात ! – पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताची आणि भारतियांच्या प्रतिभेची प्रशंसा केली आहे. भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात, यात कोणतीही शंका नाही.

ग्राहकांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची दोघा दुकान मालकांना शिक्षा

न्यायालयाने हरिद्वारमधील मद्यविक्री करणार्‍या २ दुकानांना मद्यविक्री करतांना अधिक शुल्क आकारल्याच्या प्रकरणी १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. यासह खटल्याच्या व्ययासाठी (खर्चासाठी) १० सहस्र रुपयांचा दंडदेखील केला.

उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

पाकच्या सिंधमध्ये पाडले हिंदूंचे मंदिर !

भारतातील बहुसंख्य हिंदूंचे जेथे रक्षण होऊ शकत नाही तेथे पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू, तसेच त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण कोण करणार ? हे हिंदूंना लज्जास्पद !

युक्रेनमधील खेरासनमध्ये संचारबंदी : रशियाकडून मोठ्या सैनिकी कारवाईचे संकेत

युक्रेनमधील खेरासन येथे ४ नोव्हेंबरला रात्री उशिरा संचारबंदी घोषित करण्यात आली. रशियाने नियुक्त केलेले खेरासनचे गव्हर्नर स्ट्रेमोसोव्ह म्हणाले की, येथे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.