चीनने त्याची गुप्तहेर नौका पाठवली हिंद महासागरात !

बंगालच्या उपसागरात भारताच्या आगामी क्षेपणास्त्राच्या चाचणीवर ठेवणार लक्ष !

बीजिंग (चीन) – चीनने तिची गुप्तहेर नौका ‘युआन वांग-६’ हिंद महासागरात तैनात केली आहे. चीनने ऑगस्ट २०२२ मध्ये हीच नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पाठवली होती. तेथे ती ६ दिवस थांबली होती. भारत १० आणि ११ नोव्हेंबर या दिवशी ओडिशातील व्हीलर बेटावर क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. हे बेट बंगालच्या उपसागरात आहे. चीन या नौकेच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचा मार्ग, वेग, श्रेणी आणि अचूकता यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळवू शकतो.