भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात ! – पुतिन

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताची आणि भारतियांच्या प्रतिभेची प्रशंसा केली आहे. भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात, यात कोणतीही शंका नाही. भारताला विकासाच्या संदर्भात चांगले यश मिळेल, असे वक्तव्य पुतिन यांनी रशिया एकता दिनी, म्हणजे ४ नोव्हेंबर या दिवशी केले.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन पुढे म्हणाले की, विकासाच्या दृष्टीने भारताला चांगले परिणाम दिसतील. जवळपास दीड अब्ज नागरिक त्याची खरी शक्ती आहे. या वेळी पुतिन यांनी आफ्रिकेतील वसाहतवाद, भारताची क्षमता आणि रशियाची असामान्य सभ्यता अन् संस्कृती यांवरही भाष्य केले. पुतिन यांनी गत मासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. राष्ट्रहितार्थ स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्यासाठी त्यांनी मोदी यांची प्रशंसा केली होती.