हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता ! – भूषण पोळ, विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर
येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.
हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला ! हिंदु राष्ट्रात हिंदूंचे शोषण करणारे आणि हिंदूंवर आघात करणारे कायदे अस्तित्वात नसतील !
राज्यात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा लागू करावा ! – नरेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप
हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत असून ख्रिस्ती संस्थांकडूनही त्यांचे शोषण झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी राज्यात लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाशी येथे केली.
संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’चा मोठा अड्डा !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) संघटनेच्या माध्यमातून मुसलमान युवकांना जिहादी आणि धर्मांध यांचे धडे देऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात राज्यात चालू असलेल्या कारवाईनंतर अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
ज्यांनी धान गायब केले, त्यांना पकडण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली.
दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती
या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला.
पारपत्र आणि व्हिसा सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे वारंवार गुन्हा करणार्या नायजेरियाच्या नागरिकांना बसली चपराक !
न्यायालयाच्या आदेशानंतर १० मासांनी एखाद्या गुन्ह्यात गजाआड झालेले नायजेरियाचे ५४ नागरिक त्यांना जामीन मिळूनही अधिकृत कागदपत्रे नसल्याने अजूनही न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत आहेत.
भिवंडी येथे चोर्या करणारी टोळी अटकेत !
चोर्या करणाऱ्या टोळीकडून ८ लाख १७ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.