भिवंडी येथे चोर्‍या करणारी टोळी अटकेत !

भिवंडी येथे चोर्‍या करणारी टोळी अटकेत

ठाणे, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी शहरात भ्रमणभाषसंच, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणारा आयाजअली अन्सारी (वय ३८ वर्षे), दाऊद अन्सारी (वय २८ वर्षे), सर्फराज खान (वय २६ वर्षे) आणि सुनील फुलारे (वय ३० वर्षे) या चौघांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख १७ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.