मागील वर्षी महिलांना कुंकवाविना दाखवणार्‍या आस्थापनांनी यावर्षी दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासहित दाखवले !

धर्मप्रेमी हिंदूंनी तत्परतेने केलेल्या विरोधाचा परिणाम ! असा संघटितपणा आणि तत्परता हिंदूंनी प्रत्येकच आघाताच्या वेळी दाखवावी !

पाकिस्तानमधील प्रसिद्ध पंजा साहिब गुरुद्वारामध्ये मुसलमान कलाकारांनी चपला घालून केला प्रवेश !

शिखांकडून विरोध
याविषयी ‘सिख-मुस्लिम भाई भाई’ म्हणणारे खलिस्तानवादी गप्प का ?

बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मंडपात कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमानाला अटक

गेल्यावर्षी अशाच प्रकारे मंडपात कुराण ठेवून हिंदूंवर त्याचा अवमान केल्याचा आरोप मुसलमानांनी केला होता. त्यांनी त्यांनी घडवून आणलेल्या दंगलीत अनेक हिंदू ठार झाले होते, तसेच हिंदूंच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी करण्यात आली होती !

गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी कोणते गाणे गायचे ?’, हेही ठाऊक नसणारे हिंदु गायक ! रेशमिया यांची ही कृती म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव आणि आत्मघाती धर्मनिरपेक्षता याचेच दर्शक आहे !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात हिंदु नाव धारण करून प्रवेश करणार्‍या मुसलमानाकडे सापडली प्राणघातक शस्त्रे !

मंदिराचे महामंडलेश्वर आनंद गिरि यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा
आता पोलीस यालाही ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडून देणार का ?

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालक (कारागृह) यांची मुसलमान नोकराकडून गळा चिरून हत्या

जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हत्येचे दायित्व घेतले, पोलिसांकडून हे आतंकवादी आक्रमण नसल्याचे स्पष्टीकरण !

अमेरिकेत ६० हिंदू संघटनांच्या विरोधात प्रस्ताव संमत

डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध

भटिंडा (पंजाब) येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’सह ‘सिख, मुस्लिम भाई-भाई’च्या घोषणा !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया पहाता तेथे आताच राष्ट्रपती राजवट लावून खलिस्तानवाद्यांची कीड कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !

विविध विषयांतील तज्ञ आणि संत

‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो . . . परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले