‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांची मुसलमानांना चिथावणी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारकडून राज्यातील मदरशांचे ५ ऑक्टोबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याला काही मुसलमान संघटना, पक्ष आणि नेते विरोध करत आहेत. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनीही याला विरोध करत, ‘मुसलमान सहन करत आहेत. ज्या दिवशी मुसलमान त्याच्या अधिकारासाठी उभा ठाकेल, तेव्हा सरकार स्वतःला वाचवू शकणार नाही. जो कुणी सर्वेक्षणासाठी नोटीस घेऊन येईल, त्याचे चप्पलांनी स्वागत करावे’, असे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेश के मदरसा के सर्वे पर मौलाना साजिद रशीदी के बिगड़े बोल, कहा- सर्वे वाली टीम को चप्पलों से पीटो https://t.co/cfCRwUGUl7
— Newstimes7 (@Newstimes71) September 15, 2022
मौलाना साजिद रशिदी यांच्या या आवाहनाला राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते मोहसिन रझा यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, रशिदी यांच्यासारख्या लोकांची विधाने मदरशांना चिथावणी देणारी आहेत. सरकार सर्वेक्षण करून मदरशांचे भले करू इच्छित आहे; मात्र अशी विधाने कुणी करत असेल, तर सरकारला कठोर व्हावे लागेल. या विधानावरून रशिदी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
संपादकीय भूमिकाकायदा हातात घेण्याची चिथावणी देणार्यांवर सरकारने तात्काळ गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले पाहिजे ! |