भारतात घुसखोरी करणार्‍या दोघा पाकिस्तानी नागरिकांना अटक

गुरदासपूर (पंजाब) – येथील सीमेवरून भारतात घुसणार्‍या दोघा पाकिस्तानी नागरिकांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.