रहाण्यास योग्य आणि अयोग्य देशांच्या सूचीमधील पहिल्या १० शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही !

पाकचे कराची शहर अयोग्य शहरांच्या सूचीत ६ व्या क्रमांकावर !

नवी देहली – जगभरातील १७२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ‘इकोनॉम्सिट इंटेलिजेंस युनिट’ या संस्थेने जगातील रहाण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य शहरांची सूची घोषित केली आहे. ही सूची करतांना पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन या गोष्टींचा आधार घेण्यात आला आहे. रहाण्यास योग्य आणि अयोग्य देशांच्या सूचीमध्ये पहिल्या १० शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही, तर अयोग्य शहरांच्या सूचीमध्ये पाकिस्तानमधील कराची शहर हे ६ व्या क्रमांकावर आहे.

१. या अयोग्य शहरांच्या सूचीमध्ये प्रथमस्थानी इराणची राजधानी तेहरान, त्यानंतर कॅमेरूनमधील डौआला, झिम्बाब्वेमधील हरारे, बांगलादेशची राजधानी ढाका, पापुआ न्यू गिनी येथील पोर्ट मोरेस्बी, पाकमधील कराची, अल्जेरियामधील अल्जियर्स, लिबियामधील त्रिपोली, नायरेजियामधील लागोस, तर १० व्या क्रमांकावर सीरियाची राजधानी दमास्कस हे शहर आहे.

२. दुसरीकडे रहाण्यास योग्य शहरांच्या सूचीमध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना प्रथम स्थानी आहे. त्यानंतर डेन्मार्कमधील कोपनहेगन, स्वित्झर्लंडमधील झुरिच, कॅनडातील कॅलगरी आणि व्हॅकुव्हर, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा, जर्मनीमधील जिनिव्हा, कॅनडामधील टोरोंटो, नेदरलँडस्मधील अ‍ॅम्सटरडॅम आणि १० व्या क्रमांकावर जपानमधील ओसाका आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या दोन शहरांनी स्थान मिळवले आहे.