श्रीलंकेकडून पाकच्या युद्धनौकेला त्याच्या बंदरावर मुक्काम करण्याची अनुमती

यापूर्वी भारताच्या आक्षेपानंतर चिनी युद्धनौकेला दिला होता नकार !

युद्धनौका

कोलंबो (श्रीलंका) – पाकिस्तानची चीन बनावटीची युद्धनौका ‘पी.एन्.एस्. तैमूर’ हिला श्रीलंकेच्या किनार्‍यावर १२ ते १५ ऑॅगस्टपर्यंत मुक्काम करण्याची अनुमती श्रीलंकेकडून देण्यात आली आहे. याआधी श्रीलंकेने चीनच्या गुप्तहेर युद्धनौकेला भारताने विरोध केल्यानंतर हंबनटोटा बंदरावर येण्यास मनाई केली होती.

बांगलादेशने अनुमती नाकारली

दुसरीकडे पाकच्या या युद्धनौकेने मलेशियातून परततांना बांगलादेशकडे इंधनासाठी मुक्काम करण्याची अनुमती मागितली होती; परंतु बांगलादेशने भारताच्या आक्षेपाचा अंदाज बांधून ही मागणी फेटाळली होती.

संपादकीय भूमिका

श्रीलंकेची स्थिती अत्यंत दयनीय असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही त्याची भारतविरोधी मानसिकता अद्याप नष्ट झालेली नाही, हेच या घटनेतून दिसून येते ! भारताने याविषयी श्रीलंकेला जाब विचारला पाहिजे आणि त्याला देण्यात येणारे साहाय्य बंद केले पाहिजे !