मैदानातही हिंदूंवर मात !

संपादकीय

मैदानासह प्रत्येक स्तरावरील हिंदूंचे दमन संघटितपणे रोखण्याची हीच वेळ आहे !

आशिया फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये झालेली मारहाण

कोलकाता येथे आशिया फूटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंतर अफगाण खेळाडूंनी चिडून भारतीय खेळाडूंना चक्क मारहाण करणे चालू केले. या वेळी दोन्ही गटांतील खेळाडूंमध्ये प्रचंड हाणामारी झाली. धर्मांधांची उद्दाम वृत्ती अफगाण खेळाडूंच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगासमोर आली. भारतीय खेळाडू इस्लामी देशांशी खेळतांना ‘खेळाडू’ म्हणून पहातात; परंतु इस्लामी देशातील खेळाडू मात्र भारतीय खेळाडूंकडे ‘काफीर’ म्हणून पहातात, हेच या घटनेतून पुन्हा समोर आले. जागतिक स्तरावर अशा धर्मांध खेळाडूंना चांगला फटका बसल्याविना त्यांचा उद्दामपणा न्यून होणार नाही. त्यासाठी भारत सरकारने जागतिक फूटबॉल संघटनेवर अफगाणिस्तानच्या संघावर बंदी घालण्यासाठी दबाव टाकला पाहिजे, त्याचसमवेत कायदेशीरदृष्ट्या प्रयत्न करून या खेळाडूंवर गुन्हे नोंदवून त्यांना शिक्षा केली पाहिजे. तसेच भारतातील फूटबॉल संघटनांनी या खेळाडूंना क्षमायाचना करण्यास भाग पाडले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. विदेशात जाऊन तेथील खेळाडूंना हरवल्यावरही मारहाण करण्याची अफगाण खेळाडूंमधील तालिबानी वृत्ती एवढ्यानेच न्यून होणार नाही. आशियातील क्रीडाप्रेमी जनतेने समाजमाध्यमांतून त्यांची ‘छी थू’ केली, तर त्यांना अद्दल घडू शकते. या घटनेनंतर अफगाणी खेळाडूंना कडक शासन झाले नाही, तर अन्य खेळांतील खेळाडूच काय, ‘कुणीही विदेशी भारतात येतो आणि भारतियांना टपली मारून जातो’, असे वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

इस्लामी खेळाडूंच्या बाजूने असलेले नागरिक

भारतातील धर्मांधांकडून अनेक ठिकाणी, अनेक वेळा इस्लामी देशाचे खेळाडू जिंकले, तर फटाके वाजवले जातात आणि हरले, तर येथील बहुसंख्य हिंदूंना त्रास दिला जातो. हे अनेक वर्षे चालू आहे. असे करणारी जनता ही भारताच्या बाजूची नाही, तर इस्लामी देशाच्या खेळाडूंच्या बाजूची आहे आणि ती भारताला शत्रू समजते, हे स्पष्ट होते. हे नागरिक एका अर्थाने भारताशी प्रतारणा (देशद्रोह) करतात. आतापर्यंत अशा किती नागरिकांना कडक शासन झाले आहे ?; पण तसे होतांना दिसत नाही. ‘भारतात येणाऱ्या इस्लामी देशांच्या खेळाडूंचे मनोबल यामुळे वाढते’, असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपण भारतीय खेळाडूंना काही केले, तरी भारतात आपल्याला काहीही धोका नाही, याची त्यांना निश्चिती आहे; म्हणूनच त्यांचे असे करण्याचे धाडस झाले. इस्रायल किंवा चीन यांसारख्या देशात जाऊन अफगाण खेळाडूंनी अशा प्रकारे खेळाडूंना मारहाण केली असती का ?

भारतीय खेळाडूंची स्थिती

भारतीय खेळाडूंची क्षमता चांगली असते, त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचे ते सार्थक करतात. कोणत्याही खेळातील खेळाडूंची देशासाठी खेळायची निवड झाल्यावर किंवा होतांना त्यांना जेवढ्या प्रमाणात खेळातील कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जातो, तसा त्यांच्यात राष्ट्राप्रती राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी किती भर दिला जातो ? कित्येक खेळाडू देशासाठी खेळू लागल्यावर तंबाखू, घातक शीतपेये आदींची समाजविघातक विज्ञापने केवळ पैशांसाठी करतात. याचा अर्थ जरी ते भारताचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करत असले, त्यांच्यात तेवढा राष्ट्राभिमान किंवा नीतीमत्ता असतेच असे नाही. मुळात प्रखर राष्ट्राभिमानी खेळाडू सहस्रोंच्या संख्येने देशातील जनता आणि सैनिक यांना मारणाऱ्या शत्रूराष्ट्राशी खेळण्यास कदापि सिद्धच होणार नाहीत. काही खेळाडूंनी ‘मॅच फिक्सिंग’ (पैसे घेऊन ठरवल्याप्रमाणे खेळणे) केल्याची उदाहरणे आहेत. स्वार्थासाठी देशाला हरवायलाही मागे-पुढे न पहाणाऱ्या अशा खेळाडूंमध्ये राष्ट्राभिमानाची उणीव प्रकर्षाने लक्षात येते. भारतीय खेळाडूंवर हात उचलण्याचे धाडस इस्लामी देशाच्या खेळाडूंना होते, तेव्हा सर्वच देशपातळीवरील भारतीय खेळाडूंमध्ये काही न्यूनता आहे का ? हेही पडताळले पाहिजे.

निधर्मी भारतातील सर्वधर्मसमभावी नागरिक !

‘हिंदुद्वेष करत असलेल्या पाकड्यांशी क्रिकेट खेळू नये’, असे अनेक देशप्रेमी नागरिकांना वाटते; परंतु अनेक तथाकथित निधर्मीवादी ‘खेळात धर्म का आणता ?’, अशा प्रकारची अज्ञानमूलक वक्तव्ये करतात. ‘कला आणि खेळ यांमध्ये धर्म आणू नका’, असे म्हणणाऱ्या नागरिकांनी सध्या देशात घडणाऱ्या घटना पाहून तरी धर्मांधांवरील अंधविश्वासातून बाहेर आले पाहिजे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या एका कथित वक्तव्यानंतर स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी देशभरातील मुसलमान समाज एकत्र आला आणि अनेक ठिकाणी धर्मांधांनी दंगली करून हैदोसही घातला. त्याचाच एक परिणाम म्हणून जगभरातील मुसलमानांनी ‘औरंगजेब’ या नावाने ‘ट्विटर ट्रेंड’ चालवला. ‘डॅ्रगन फोर्स मलेशिया’ या हॅकर्स गटाने जगभरातील हॅकर्सना भारतातील संकेतस्थळांवर आक्रमण करण्याचे आवाहन करून ७० संकेतस्थळे ‘हॅक’ केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५० संकेतस्थळे हॅक झाली आहेत. सायबर आक्रमणे भारतात होण्यामागे एक महत्त्वाचे कारण त्या संदर्भातील गुप्तहेर तंत्रज्ञ आपल्याकडे नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आक्रमणांची पूर्वसूचना मिळत नाही. देशातील अधिकोषांची संकेतस्थळे अशा प्रकारे हॅक झाली आणि त्यातील माहितीची हानी झाली, तर भारतीय नागरिकांची किती आर्थिक हानी होऊ शकते, याची कल्पनाही करता येणार नाही. सीमेवर, रस्त्यावर, मैदानात आणि तांत्रिक क्षेत्रातही धर्मांध भारतियांवर, म्हणजे बहुसंख्य हिंदूंवर कुरघोडी करत आहेत. अशा वेळी देशभरातील हिंदु संघटनांच्या माध्यमातून हिंदूंनी राष्ट्रासाठी एकत्र येऊन संघटितपणे सर्व स्तरांवर मात करण्याची ही वेळ आहे. अफगाण खेळाडूंची कृती ही प्रातिनिधिक आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचे दमन संघटितपणे रोखण्याची ही वेळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !