अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.

मालदीवमध्ये मुसलमानांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केली तोडफोड !

इस्लामबहुल मालदीवमधील सरकार भारत शासनाच्या बाजूचे असल्याने मुसलमानांनी जाणीवपूर्वक योगदिनाला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते !

बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणीबाणी !

पाकिस्तान इस्लामी देश असतांना तेथे शरियत कायद्यानुसार बलात्कार्‍यांना कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा का दिली जात नाहीत ?, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो !

पाकिस्तानमध्ये अननुभवी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी गर्भवती हिंदु महिलेचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडले !

पाकच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील भील समाजातील एका गर्भवती हिंदु महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करतांना डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडून दिल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्या मुसलमान अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?

भारतीय नागरिकाला संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी घोषित करण्याचा पाकचा प्रयत्न भारताने उधळला !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला.

आम्ही आता अफगाणिस्तानमध्ये राहू इच्छित नाही !

पाकप्रेमी खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? भारतामध्ये अराजक निर्माण करणारे शीख का बोलत नाहीत ?

इस्रायल सरकार कोसळळे, ३ वर्षांत पाचव्यांदा निवडणूक घेण्याची वेळ !

इस्रायलमधील नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वात असणारे आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. परिणामी देशात गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये काश्मीरविषयी आपेक्षार्ह प्रश्‍न विचारणार्‍या प्राध्यापकावर कारवाई

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्‍नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे शाळा आणि महाविद्यालय यांच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

खलिस्तानवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !