भारतीय नागरिकाला संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी घोषित करण्याचा पाकचा प्रयत्न भारताने उधळला !  

टी. एस. त्रिमूर्ती

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत, तर अल्बानियाला जून मासासाठी या परिषदेचे अध्यक्षपद मिळालेले आहे. वर्ष २०२० मध्येही पाकने असाच प्रयत्न केला होता. तेव्हाही ५ सदस्यांनी पाकचा प्रयत्न उधळून लावला होता.