भारत शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी लोकांना हाकलण्याचा केला प्रयत्न !
माले (मालदीव) – येथील नॅशनल फूटबॉल स्टेडियममध्ये भारत शासनाकडून २१ जून या दिवशी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी जिहादी मुसलमानांच्या जमावाने स्टेडियममध्ये घुसून तेथे तोडफोड केली. तसेच येथे योगासने करणार्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. नंतर बळाचा वापर करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.
Watch: Islamists disrupt Yoga Day celebrations organised by Indian Govt, President Solih says probe initiatedhttps://t.co/2O507qBYxc
— OpIndia.com (@OpIndia_com) June 21, 2022
याविषयी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलिह यांनी ट्वीट करून सांगितले की, या घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याला उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा केली जाईल. याकडे आम्ही गांभीर्याने पहात आहोत.
An investigation has been launched by @PoliceMv into the incident that happened this morning at Galolhu stadium.
This is being treated as a matter of serious concern and those responsible will be swiftly brought before the law.
— Ibrahim Mohamed Solih (@ibusolih) June 21, 2022
संपादकीय भूमिकाइस्लामबहुल मालदीवमधील सरकार भारत शासनाच्या बाजूचे असल्याने मुसलमानांनी जाणीवपूर्वक योगदिनाला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते ! |