भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ‘काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला पाहिजे का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. ही प्रश्नपत्रिका बनवणार्या प्राध्यापकावर मध्यप्रदेश सरकारने कारवाई केली आहे.
MPPSC की परीक्षा में कश्मीर से जुड़ा विवादित प्रश्न पूछने का प्रसंग आपत्तिजनक है।
विवादास्पद प्रश्न पूछने वाले दोनों पेपर सेटर्स पर भविष्य में प्रश्न पत्र तैयार करने पर रोक लगा दी गई है। pic.twitter.com/CSN6OnSN7I— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) June 21, 2022
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वरील प्रश्नावर दोन पर्याय देण्यात आले होते. पहिल्या पर्यायामध्ये ‘यामुळे भारताचे पैसे वाचतील’, तर दुसर्यामध्ये ‘अशा निर्णयामुळे अशा प्रकारच्या अन्य मागण्या वाढतील’, असे म्हटले होते.