कर्नाल (हरियाणा) येथे शाळा आणि महाविद्यालय यांच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कर्नाल (हरियाणा) – येथील डीएव्ही शाळा आणि दयाल सिंह महाविद्यालय यांच्या भिंतींवर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा लिहिण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या घोषणा पुसल्या आहेत. याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी पंजाबच्या संगरूर येथील काली माता मंदिराच्या भिंतींवर, तसेच जालंधर येथील देवी तालाब मंदिराच्या भिंतींवरही अशा प्रकारच्या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !
  • ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणणारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील शिखांच्या दुस्थितीविषयी मात्र मौन बाळगतात !