बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्या मुसलमान अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात शरणार्थी म्हणून रहात असलेले ११ लाख रोहिंग्या मुसलमान देशात सामाजिक समस्या निर्माण करत आहेत. ते अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. बांगलादेशातील कॅनडाचे नवनियुक्त उच्चायुक्त लिली निकोल्स यांनी शेख हसीना यांची भेट घेतल्यावर त्या बोलत होते. शेख हसीना यांनी निकोल्स यांना सांगितले की, रोहिंग्यांना चांगली सुविधा मिळण्यासाठी एका बेटावर त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. येथे १ लाख रोहिंग्यांना पाठवण्यात आले आहे.

बांगलादेशातील रोहिंग्या सातत्याने आंदोलन करून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ म्यानमार देशात जाऊ देण्याची मागणी करत आहेत; मात्र म्यानमार त्यांना परत घेण्यास सिद्ध नाही.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ? शेख हसीना उघडपणे रोहिंग्यांविषयी असे म्हणू शकतात, तर भारत बांगलादेशी घुसखोर मुसलमानांविषयी का बोलत नाही ?