कोपनहेगन (डेन्मार्क) – डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये इस्रायलच्या दूतावासाजवळ २ बाँबस्फोट झाले आहेत. यात जीवितहानी झालेली नाही. पोलीस पथक याचे अन्वेषण करत आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर हे बाँबस्फोट झाले. ‘डेन्मार्कच्या घटनेचा इराणसमवेतच्या संघर्षाशी कोणताही संबंध समोर आलेला नाही. या स्फोटांबाबत काहीही बोलणे घाईचे होईल. अन्वेषणानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल’, असे पोलिसांनी सांगितले.