बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणीबाणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये महिला आणि मुले यांच्यावर सातत्याने बलात्काराच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताचे गृहमंत्री अता तरार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, पंजाब प्रांतात प्रतिदिन बलात्काराच्या ४-५ घटना समोर येत आहेत. त्यावर उपाय काढण्यावर आम्ही विचार करत आहोत. समाज आणि सरकारी अधिकारी यांच्यासाठी हे गंभीर सूत्र आहे. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आम्हाला आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यास बाध्य व्हावे लागले. अशा घटनांविषयी नागरिक, संस्था, महिला संघटना, शिक्षक आणि अधिवक्ता यांचा सल्ला घेणार आहोत.

संपादकीय भूमिका

  • बलात्कारांच्या घटनांमुळेही आणीबाणी लागू करावी लागली, हे पाकिस्तानने दाखवून दिले आहे ! भारतातील पाकप्रेमी याविषयी बोलतील का ?
  • पाकिस्तान इस्लामी देश असतांना तेथे शरियत कायद्यानुसार बलात्कार्‍यांना कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा का दिली जात नाहीत ?, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो !