अफगाणिस्तानातील शिखांचे दुःख !
काबूल (अफगाणिस्तान) – आम्हाला अफगाणिस्तानमध्ये कोणतेही भविष्य नाही. आमच्या सर्व अपेक्षा संपल्या आहेत. आम्ही येथे भीतीच्या सावटाखाली जगत आहोत. त्यामुळे आता आम्ही येथे राहू इच्छित नाही, अशी भावना अफगाणिस्तानमध्ये रहात असलेल्या शिखांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच काबूलमधील एका गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटकडून आतंकवादी आक्रमण करण्यात आले होते. यात काही शीख घायाळ झाले. त्यानंतर आता शिखांकडून वरील भावना व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर अनेक शिखांनी या गुरुद्वारामध्ये शरण घेतली होती. या गुरुद्वारात आणि शेजारी अनेक शीख कुटुंबे रहात आहेत. आता याच गुरुद्वाराला लक्ष्य करण्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये केवळ २० शीख कुटुंबे म्हणजे जवळपास १५० शीख शिल्लक आहे.
Afghanistan gurdwara attack: Sikhs say ‘We don’t feel safe’ https://t.co/YP7EhXpN2i
— BBC Asia (@BBCNewsAsia) June 18, 2022
संपादकीय भूमिकापाकप्रेमी खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? भारतामध्ये अराजक निर्माण करणारे शीख का बोलत नाहीत ? |