भाजपच्या मुसलमान नेत्याला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण !

मुसलमानांची असहिष्णुता ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प का ?

आगरा (उत्तरप्रदेश) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या तरुणीला हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल्याने तिचा मृत्यू !  

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने तिच्यावर भारतात बंदी घालणेच योग्य !

‘पूजा स्थळ कायद्या’तील काही कलमांच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘पूजा स्थळ कायदा १९९१’च्या (‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, १९९१’च्या ) काही कलमांच्या वैधतेला भाजपचे माजी खासदार चिंतामणी मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले.

राजस्थानमध्ये युरेनियमचा प्रचंड साठा सापडला !

झारखंड आणि आंध्रप्रदेश या राज्यांनंतर आता राजस्थानमध्ये युरेनियमचे प्रचंड साठे सापडले आहेत. येथील खंडेला परिसरात खाणकामाची सिद्धता चालू असतांना १०८६.४६ हेक्टर क्षेत्रात १.२ कोटी टन युरेनियम आणि संबंधित खनिजांचा साठा मिळाला आहे.

हरिद्वार येथे चालत्या गाडीत आईसह तिच्या ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा करणे, हाच अशा घटना रोखण्याचा उपाय आहे, हे सरकारला कधी कळणार ?

बिलिव्हर्सचा पास्टर (पाद्री) डॉम्निक यांना गाडीच्या रस्ताकरात दिलेली ३ लक्ष रुपयांची सूट भरण्याचा वाहतूक खात्याचा आदेश

पास्टर डॉम्निक यांनी मर्सिडीज गाडी व्यक्तीगत कामासाठी वापरली आणि त्यामुळे रस्ताकराच्या शुल्कात दिलेली सूट अनधिकृत ठरते. रस्ताकरात सूट कोणत्या आधारे दिली याची चौकशी होऊन तत्कालीन उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !

गोव्यात ५ मासांत अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

उत्तर कर्नाटक, गदग जिल्हा, खानापूर आणि हुलिया या दुर्गम भागांत उसाच्या शेतीत मधोमध काही चौरस मीटरमध्ये गांजाची लागवड केली जाते आणि याचे पूर्ण नियंत्रण अमली पदार्थ माफियांकडे असते. या अमली पदार्थांची पुढे गोव्यात तस्करी केली जाते.

उत्तर गोवा किनारपट्टीत भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस

बनावट कागदपत्रे सिद्ध करून ‘रिअल इस्टेट डेव्हलपर’ना (बांधकाम व्यावसायिकांना) भूमी विकल्याची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. उत्तर गोवा किनारपट्टीत विशेषत: आसगाव परिसरात अशी अनेक प्रकरणे आहेत.

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी आणि तस्करांसाठी भारत बनत आहे अनुकूल ठिकाण ! – अमेरिकेतील संशोधन संस्था

अमली पदार्थांचे तस्कर भारताला अमली पदार्थ निर्मितीचे माहेरघर बनवू पहात आहेत. हे गंभीर असून केंद्र सरकारने या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !