राजस्थानमध्ये युरेनियमचा प्रचंड साठा सापडला !

अण्वस्त्रे बनवण्यासाठीही उपयुक्त !

सीकर (राजस्थान) – झारखंड आणि आंध्रप्रदेश या राज्यांनंतर आता राजस्थानमध्ये युरेनियमचे प्रचंड साठे सापडले आहेत. येथील खंडेला परिसरात खाणकामाची सिद्धता चालू असतांना १०८६.४६ हेक्टर क्षेत्रात १.२ कोटी टन युरेनियम आणि संबंधित खनिजांचा साठा मिळाला आहे. युरेनियमच्या संवर्धनाच्या आधारावर त्याचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जाईल कि नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

१. राजस्थान सरकारने २६ जूनला खाणकामासाठी ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाशी करार केला आहे. आस्थापन अनुमाने ३ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. साधारण ३ सहस्र लोकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.

२. राज्याच्या खाण आणि पेट्रोलियम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुबोध अग्रवाल म्हणाले की, युरेनियम हे जगातील दुर्मिळ खनिजांपैकी एक मानले जाते. युरेनियम हे अणुऊर्जेसाठी अत्यंत मौल्यवान खनिज आहे.