आगरा (उत्तरप्रदेश) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या तरुणीला हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल्याने तिचा मृत्यू !  

(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता दांपत्याप्रमाणे एकत्र रहाणे)

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या एका तरुणीचे हात बांधून तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याने तिचा मृत्यू झाला. रितिका असे या तरुणीचे नाव आहे. ती विपुल अग्रवाल या तरुणासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होती. या प्रकरणी पोलिसांनी सुनीता आणि सुशीला या दोन महिलांसह आकाश गौतम या तरुणाला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. विपुल हा विवाहित असून त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

संपादकीय भूमिका

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने तिच्यावर भारतात बंदी घालणेच योग्य !