हरिद्वार येथे चालत्या गाडीत आईसह तिच्या ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

रुडकी (हरिद्वार) – येथे चालत्या चारचाकी वाहनामध्ये महिला आणि तिच्या ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ‘घरी सोडतो’ असे सांगत सोनू नावाच्या आरोपीने या दोघींना त्याच्या चारचाकी गाडीमध्ये बसवले. गाडीमध्ये आरोपीसह त्याचे मित्रही बसले होते. त्यांनी दोघींवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी हे पीडिता आणि तिच्या मुलीला रस्त्यात सोडून पळून गेले. पीडितेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पीडिता तिच्या मुलीसमवेत रात्रीच्या वेळी पिरान कालियार या मुसलमान धार्मिक स्थळावरून घरी जात होती. त्या वेळी ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा करणे, हाच अशा घटना रोखण्याचा उपाय आहे, हे सरकारला कधी कळणार ?