भाजपच्या मुसलमान नेत्याला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील भाजपचे नेते फैसल मलिक यांनी त्यांना त्यांच्या धर्मबांधवांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. यानंतर पोलिसांनी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फैसल कानपूर येथील भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे छावणी मंडल भागाचे कोषाध्यक्ष आहेत. ते भाजपमध्ये असल्याने मुसलमानांचा त्यांच्यावर रोष आहे. यामुळेच त्यांना मारहाण करून त्यांची दाढी कापण्यात आली.

फैसल यांचा या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, दाढी ठेवून भाजपमध्ये सहभागी होणे गुन्हा आहे का ? जर असे असेल, तर भाजपने मला पक्षातून काढून टाकावे आणि नसेल, तर ज्यांनी मला मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांची असहिष्णुता ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प का ?